loader
Breaking News
Breaking News
Foto

म्हसळ्यात शिवसेना तालुका संघटनेच्यावतीने ६० वा वर्धापनदिन साजरा

म्हसळा - म्हसळयात शिवसेना तालुका संघटनेच्यावतीने शिवसेनेचा ६० वर्धापनदिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुह्दयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले. तसेच स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे नगरपंचायत सफाई कर्मचार्‍यांची मोफत आरोग्य तपासणी आणी त्यांचा सन्मान करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिवसेना’ आमच्यासाठी फक्त संघटना किंवा पक्ष नसून शिवसेना म्हणजे वंदनीय बाळासाहेबांनी आमच्यावर केलेला संस्कार, विचार, आचार आहे. आज जो काही मान, सन्मान, सामाजिक, राजकिय ओळख, प्रतिष्ठा मिळतेयं ती केवळ आणि केवळ शिवसेनेमुळेचं.! त्यामुळे यापुढेही जिवात जीव असेपर्यंत शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत राहायचा निर्धार वर्धापन दिनाच्या निमित्ताने उपस्थितांकडून करण्यात आला. त्यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख नंदू शिर्के, तालुकाप्रमुख तुकाराम चाळके, शहर प्रमुख अभय कळमकर, युवासेना तालुका अधिकारी कौस्तुभ करडे, उपतालुका प्रमुख राजाराम तीलटकर, दीपल शिर्के, अंकुश नटे, मोहन शिंदे, नजीर कादरी आणी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg