loader
Breaking News
Breaking News
Foto

महाराष्ट्र नगरोथान महाअभियान अंतर्गत उभारण्यात आलेल्या आधुनिक रिक्षा स्टँडचे उत्साहपूर्ण वातावरणात लोकार्पण

दापोली (वार्ताहर ) : महाराष्ट्र नगरोथान महाअभियान अंतर्गत सुमारे १३ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या दापोलीतील एस. टी. स्टॅन्ड समोरील आधुनिक रिक्षा स्टँडचे आज उत्साहपूर्ण वातावरणात लोकार्पण करण्यात आले. मागील जवळपास दोन दशकांहूनही अधिक काळ या रिक्षा स्टॅंडच्या काँक्रिटीकरणाची मागणी होत होती. स्थानिक आमदार आणि राज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रयत्नातून जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने शासनाने महाराष्ट्र नगरोथान महाअभियान अंतर्गत सुमारे १३ लाख रुपयांचा निधी या कामाकरिता मंजूर करण्यात आला. आज या रिक्षा स्टँडचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमास दापोलीच्या नगराध्यक्षा कृपा घाग, शिवसेना जिल्हाप्रमुख सुधीर कालेकर, शिवसेना शहरप्रमुख प्रसाद रेळेकर, जिल्हा परिषद सदस्य किशोर देसाई उपनगराध्यक्ष खालिद रखांगे, गटनेत्या शिवानी खानविलकर, नगरसेविका प्रीती शिर्के, अन्य नगरसेवक, उप शहरप्रमुख मंदार केळकर, माजी नगराध्यक्षा सौ. रसिका पेठकर, युवती सेना शहर अधिकारी कीर्ती परांजपे, माजी नगरसेवक प्रकाश साळवी यांच्यासह शिवसेनेचे शहर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रिक्षा चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोलीसारख्या पर्यटननगरीत आणि तालुक्याच्या मुख्य ठिकाणी रिक्षा चालक हे केवळ प्रवासी वाहतुकीचे साधन नसून शहराच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना बाजारपेठ, शासकीय कार्यालये, रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि पर्यटनस्थळांपर्यंत पोहोचविण्यात रिक्षा चालकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. शहरात येणाऱ्या पर्यटकांचा पहिला संपर्क अनेकदा रिक्षा चालकांशीच होत असल्याने ते दापोलीचे अनौपचारिक ब्रँड अम्बेसेडर म्हणूनही ओळखले जातात. विशेष म्हणजे, रिक्षा चालक-मालक संघटनेची स्वतंत्र आणि सुसज्ज रिक्षा स्टँडची मागणी गेल्या जवळपास २५ वर्षांपासून प्रलंबित होती. अनेक वेळा पाठपुरावा करूनही या मागणीला मूर्त स्वरूप मिळाले नव्हते. मात्र स्थानिक आमदार योगेश कदम यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्यामुळे अखेर ही बहुप्रतीक्षित योजना प्रत्यक्षात साकार झाली आहे.

टाईम्स स्पेशल

नवीन रिक्षा स्टँडमुळे रिक्षा चालकांना उन्हाळा, पावसाळा आणि इतर प्रतिकूल परिस्थितीत सुरक्षित निवारा उपलब्ध होणार असून प्रवाशांनाही अधिक सुव्यवस्थित सेवा मिळण्यास मदत होणार आहे. शहरातील वाहतूक व्यवस्थेतही यामुळे सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी रिक्षा चालकांच्या सेवाभावी भूमिकेचे कौतुक करताना, दापोलीच्या विकास प्रक्रियेत वाहतूक व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित केले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीची पूर्तता झाल्याने रिक्षा चालक-मालक संघटनेच्या सदस्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, हा दिवस त्यांच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg