loader
Breaking News
Breaking News
Foto

मुक्ताई अ‍ॅकेडमीचे बाळकृष्ण पेडणेकर व मयुरेश मालवणकर जिल्ह्यातील पहिले राज्य बुदधिबळ पंच!

सिंधुदुर्ग, (प्रतिनिधी) - महाराष्ट्र बुदधिबळ असोसिएशन आणि रत्नागिरी जिल्हा बुदधिबळ असोसिएशन यांनी संयुक्तरित्या रत्नागिरी येथे राज्यस्तरीय बुदधिबळ पंच-आर्बिटर लेखी परीक्षेचे आयोजन केले होते. रत्नागिरी जिल्हा बुदधिबळ असोसिएशनतर्फे प्रथम दोन दिवसाची कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळा आणि पंच परीक्षेत राज्यातील तब्बल पंचेचाळीस जणांनी सहभाग घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन मुक्ताई अ‍ॅकेडमीचा सावंतवाडीचा बाळकृष्ण पेडणेकर व मालवणचा मयुरेश मालवणकर यांनी कार्यशाळेत सहभाग घेतला आणि पंच परीक्षा दिली. पंच परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून बाळकृष्ण व मयुरेश चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुक्ताई अ‍ॅकेडमीचे अध्यक्ष श्री.कौस्तुभ पेडणेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली विदयार्थ्यांनी हे यश संपादन केले. अ‍ॅकेडमीच्या सचिव सौ.स्नेहा कौस्तुभ पेडणेकर यांनी यशस्वी विदयार्थ्यांचे अभिनंदन करतानाच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सर्व स्तरातून यशस्वी विदयार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg