loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकणातील काजू उत्पादक शेतकर्‍यांसाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड एग्रीकल्चरचे अध्यक्ष रविंद्र माणगावे यांची भेट घेवून जयवंत विचारे यांची मागणी

मुंबई - कोकणातील संकटात सापडलेल्या काजू व्यवसाय व उद्योगांबाबतीतील विविध अडचणींबद्दल महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड एग्रीकल्चरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांची रत्नागिरी कृषी प्रक्रिया सहकारी संस्थेचे अध्यक्ष जयवंत तथा दादा विचारे यांनी भेट घेतली. मुंबई येथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड एग्रीकल्चरच्या मुख्य कार्यालयात ही भेट झाली. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात काजू उत्पादित होतो. मात्र यंदा मोठ्या प्रमाणात या काजू पिकाला विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासन पातळीवर शेतकर्‍यांसाठी व उद्योजकांसाठी दिलासा मिळवण्यासाठी जयवंत विचारे यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड एग्रीकल्चर चे अध्यक्षांची भेट घेऊन शेतकर्‍यांना सह उद्योजकांसाठी दिलासा देण्याची मागणी केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी लवकरच याबाबतीत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून शेतकरी व उद्योजकांच्या समस्या शासन दरबारी मांडून यातून शेतकरी उद्योजकांसाठी दिलासा मिळेल याची ग्वाही दिली. यावेळी विचारे म्हणाले की, वाढत्या महागाईच्या कचाट्यात काजू उद्योग सापडला असून अनेक कारखाने बंद पडण्याच्या उंबरठ्यावर आहेत. पेट्रोल-डिझेल दरवाढ, कच्च्या काजूचे वाढते भाव आणि उत्पादन खर्चामुळे काजू उद्योग संकटात असून हजारो कामगारांच्या रोजगारावर गदा आली आहे. कोकणासह राज्यातील काजू प्रक्रिया उद्योग आज गंभीर आर्थिक संकटाचा सामना करीत आहे. गेल्या काही वर्षांपासून उत्पादन खर्चात सातत्याने वाढ होत असताना पक्क्या काजूच्या विक्रीदरामध्ये अपेक्षित वाढ झालेली नसल्याने कारखानदारांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg