loader
Breaking News
Breaking News
Foto

विमानाने मुंबईत आणलेल्या गोकुळ गीतेंना शिवसेनेने ठेवले वेटिंगवर , सामंत यांचे यशस्वी प्रयत्न

मुंबई: नाशिक विधान परिषद निवडणूक जिंकताच अपक्ष उमेदवार गोकुळ गीतेंचे राजकीय वजन वाढले असले तरी कालपर्यंत ज्या गोकुळ गीते यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी मंत्री उदय सामंत प्रयत्न करीत होते ,त्याच सामंतांनी आज गीतेंना मुंबईला स्पेशल खाजगी विमानाने आणले. गोकुळ गीते यांच्या अंगावरचा विजयाचा गुलाल पुसण्याआधीच शिवसेनेने गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचे समजते मात्र मुंबईत येताच काही भलतेच घडल्याचे चित्र पाहायला मिळाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुंबईला आलेल्या गोकुळ गीतेंना शिंदे सेनेने वेटिंग वर ठेवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या विमानात उदय सामंत, आमदार किशोर पाटील ,माजी खासदार उमेश पाटील ही त्यांच्या सोबतीला होते .खरे तर या निवडणुकीत बरेच राजकारण झाले. गोकुळ गीते यांनी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवली होती ,त्यांनी या निवडणुकीत माघार घ्यावी म्हणून उदय सामंत आणि गिरीश महाजन यांनी आठवडाभर प्रयत्न केले होते. त्यानंतर गीतेंनी थांबण्याचा निर्णय घेतला होता पण त्यांनी उमेदवारी कायम ठेवली होती, या निवडणुकीत गोकुळ गीते यांनी शिवसेनेचे नरेंद्र दराडेना पराभूत केले आहे ,गोकुळ गीते शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे बोलले जाते पण अजून मात्र हे नक्की झालेले नाही.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg