loader
Breaking News
Breaking News
Foto

MHT CET पीसीएम परीक्षेत रोटरी अकॅडमी महाडचे सुयश

एमएचटी - सीईटी पी.सी.एम ग्रुप परीक्षेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालामध्ये रोटरी अकॅडमी महाडमधील 5 विद्यार्थ्यांनी 90 पेक्षा अधिक पर्सेनटाईल गुण प्राप्त करून उज्ज्वल यश संपादन केले आहे. इयत्ता 12 वी नंतर मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी व ॲग्रीकल्चर यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सदर एमएचटी - सीईटी (MHT CET) परीक्षा ऑनलाईनरित्या घेतली जाते. यावर्षीही (MHT CET) या प्रवेश परीक्षेत रोटरी अकॅडमी महाडच्या PCM ग्रुपच्या विद्यार्थ्यांमध्ये निहार जोशी - 98.51 पर्सेनटाईल, आर्या नाईक - 97.16 पर्सेनटाईल, सम्यक शिर्के - 95.70 पर्सेनटाईल, मृदूल घटे - 93.44 पर्सेनटाईल व आरुष पाटील 93.37 पर्सेनटाईल गुण मिळवून यश प्राप्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमेस्ट्री, मॅथ्स् या विषयांचे शिक्षक, वर्गशिक्षक, परीक्षा विभागातील शिक्षक यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी (MHT CET) PCM परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg