loader
Breaking News
Breaking News
Foto

लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी सेवा उपक्रम संपन्न

खेड (दिलीप देवळेकर )- नवभारत वस्तीगृह, भरणे नाका, खेड येथे लायन्सचे सभासद, दानशूर व्यक्तिमत्त्व ला. बशीरभाई हजवानी यांच्या सहकार्याने व लायन्स क्लब ऑफ खेड सिटी यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी सेवा उपक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाने झाली. त्यानंतर वस्तीगृहासाठी जीवनावश्यक जिन्नसांचे वाटप करण्यात आले. तसेच बशीरभाई हजवानी यांनी स्वतः विद्यार्थ्यांना ज्यूसचे वाटप करून त्यांच्याशी आत्मीय संवाद साधला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी रोहन विचारे, पंकज शहा, हानिफभाई घनसार यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच आजच्या उपक्रमाचे प्रमुख बशीरभाई हजवानी यांनीही सेवाभावाचे महत्त्व अधोरेखित करणारे प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला नवभारत वस्तीगृहाचे सचिव गोवाळकर, सहसचिव धुमक गुरुजी, खजिनदार राजाभाऊ बैकर, तसेच नवभारत विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg