loader
Breaking News
Breaking News
Foto

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा अनोखा उपक्रम

वैभववाडी (प्रतिनिधी) - मत्स्यव्यवसाय मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सभापती सिद्धेश रावराणे यांच्या वतीने दिव्यांग विदयार्थ्यांसाठी राबविलेला अनोखा उपक्रम राबविण्यात आला. तालुक्यातील एकूण १४ दिव्यांग विदयार्थ्यांना शैक्षणिक साहीत्याचे सभापती सिध्देश रावराणे व पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी प्रत्यक्ष विदयार्थ्यांच्या घरी जावून शैक्षणिक साहीत्याचे वितरण केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वितरीत केलेल्या विदयार्थ्याची नावे तन्मय मनिष रावराणे रा. सिध्दाचीवाडी, आर्यन म्हांबू कोकरे रा.कुर्ली, दक्षता सुनील मोहीते रा. खाबाळे मोहीतेवाडी, सुमित विजय फाळके रा. एडगाव, रिदय राहूल जाधव रा. सांगुळवाडी, वेद सुभाष पवार रा. खांबाळे मधलीवाडी, श्रावणी मंगेश मांजलकर रा. लोरे हेळेवाडी, आरोही समीर कुलकर्णी रा. वैभववाडी तरी वरील विदयार्थ्यांच्या घरी जाऊन साहित्य वितरित केले. या उपक्रमामुळे विदयार्थी व पालक यांचा चांगला प्रतिसाद लाभला. पालकांनी सभापती यांचे आभार व्यक्त केले. यावेळी विशेष शिक्षक चव्हाण व तापेकर उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg