loader
Breaking News
Breaking News
Foto

'सिंधुरत्न कार्यकारी समिती' रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्षपदी माजी आमदार डॉ. विनय नातू

वरवेली (वार्ताहर) - सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमधील नैसर्गिक साधनसंपत्तीचे परिणामकारक नियोजन करून या जिल्ह्यांचा सर्वंकष विकास करण्याच्या दृष्टीने या दोन जिल्ह्यांसाठी 'सिंधुरत्न समृध्द योजना २.०' ही योजना सन २०२६-२७ ते २०२८-२९ या ३ वर्षासाठी राबविण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. याकरिता 'सिंधुरत्न समृध्द योजना २.०' भाग-२ अंतर्गत स्वतंत्र आराखडा तयार करणे व त्याची कालबध्द अंमलबजावणी करण्याकरिता सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्याकरिता दोन स्वतंत्र "सिंधुरत्न कार्यकारी समिती" गठित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार रत्नागिरी जिल्हा कार्यकारी समिती उपाध्यक्षपदी माजी आमदार डॉ. विनय नातू यांची निवड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सिंधू रत्न योजनेचा उद्देश म्हणजे स्थानिक नैसर्गिक साधनसंपत्ती आणि अथांग समुद्रकिनाऱ्याचा पुरेपूर वापर करून स्थानिक पातळीवर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे, पर्यटन स्थळांवर आवश्यक पायाभूत सुविधा उभारणे आणि बॅक वॉटर व जलक्रीडा क्षेत्रांचा विकास करून पर्यटकांना आकर्षित करणे, मासळी उतरवण्याचे अत्याधुनिक केंद्र, आधुनिक मासळी बाजार आणि मत्स्य साठवणूक केंद्रांची निर्मिती करून कोकणातील मच्छीमारांना सक्षम करणे, आंबा आणि काजूसारख्या कृषी व फलोत्पादनाला प्रोत्साहन देणे आणि महिला बचत गटांना उद्योग-व्यवसायासाठी मदत करणे, या सर्व विकासात्मक कामांतून स्थानिक नागरिकांचे जीवनमान उंचावणे आणि त्यांचे दरडोई उत्पन्न वाढवणे हा आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg