loader
Breaking News
Breaking News
Foto

पहिल्याच पावसात महामार्गावर दरड, तात्काळ मार्ग मोकळा करण्यास संबधित विभागाकडून कार्यवाही

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - पहिल्याच पावसात मुबई-गोवा महामार्गाला दणका बसला आहे. देवधे ते वेरळ दरम्यान दरड कोसळली असून वाहतुकीस अडथळा होण्याआधिच संबधित विभागाकडून जेसीबीद्वारे माती, दगड बाजूला करून मार्ग मोकळा केला. गुरुवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यंदा पावसाचे उशिरा आगमन झाले. अवघे तीन दिवस पाऊस सरीवर कोसळत आहे. मात्र सुरूवातीच्या पावसापासून पडझडीच्या घटना घडू लागल्या आहेत. काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले, मात्र कोणतीही जीवित हानी झालेली नाही. पाऊस सरीवर पडत असल्याने भात पेरणीची, नागरणीची कामे करण्यात शेतकरी गर्क झाला असल्याचे दिसून येत आहे. पाऊस चांगला पडत असल्याने बळीराजा सुखावला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg