loader
Breaking News
Breaking News
Foto

छत्रपती संभाजी राजे सैनिक स्कूल जामगे मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

खेड - शिवतेज आरोग्य सेवा संस्था खेड संचलित छत्रपती संभाजी राजे सैनिक स्कूल जामगे या प्रशालेमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास होण्यासाठी योगाचे प्रशिक्षण दिले जाते. 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून प्रशालेचे कमांडंट श्रीकिशन यादव यांनी बालपणापासून ते वृद्धापकाळपर्यंत योगासनाचे शारीरिक व मानसिक फायदे विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. तसेच 'विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास व निरोगी शरीर यासाठी योगासनाचे महत्त्व' या विषयावर मार्गदर्शन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रशालेचे क्रीडा शिक्ष सूर्यवंशी आर.डी. यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध योगासनांची प्रात्यक्षिके केली. या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉक्टर खोत एम. एस., कमांडंट श्रीकिशन तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षण निदेशक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg