खेड (प्रतिनिधी) : पावसाळ्यात नागरिकांना स्वच्छ व निरोगी वातावरण मिळावे यासाठी अविरत सेवा देणार्या कंत्राटी सफाई कर्मचार्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने खेड नगरपरिषदेतर्फे रेनकोटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे मुसळधार पावसातही सफाई कर्मचार्यांना आपली जबाबदारी अधिक सुरक्षितपणे आणि कार्यक्षमतेने पार पाडणे शक्य होणार आहे.
या कार्यक्रमप्रसंगी नगराध्यक्ष सौ. माधवीताई बुटाला यांनी सफाई कर्मचार्यांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे असून शहर स्वच्छ ठेवण्यात त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले. तसेच पावसाळ्यात काम करताना त्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी नगरपरिषद कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी खेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे, स्वच्छता व आरोग्य सभापती तोसिफ खोत, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. रसिका खेडेकर, बांधकाम सभापती सुनील दरेकर, नगरसेवक संजय मोदी, यांच्यासह नगरपरिषदेचे पदाधिकारी, कर्मचारी व सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाचे सफाई कर्मचार्यांनी स्वागत करत नगरपरिषदेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.












































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.