loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा तालुक्यातील गोंडेसखल रोड परिसरात धाडसी चोरी, परिसरात खळबळ

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा तालुक्यात घराचा दर्शनी दरवाज्याचा कडी कोयंडा उचकटून चोरट्याने घरात प्रवेश करून बेडरूममध्ये असलेल्या कपाटातील ९० हजार रूपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना लांजा गोंडेसखल रोड येथे भर वस्तीत घडली आहे. या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले असून पोलीसांकडून चोरांचा शोध सुरू आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याबाबत लांजा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार लांजा गोंडेसखल रोड येथील रविंद्र राजाराम पावसकर (वय ६०) यांनी याबाबतची तक्रार लांजा पोलीस ठाण्यात केली आहे. ही घटना १६ जून रोजी रात्री ९.३० ते दिनांक १७ जून रोजी १. ५५ या कालावधीत घडली आहे. रविंद्र पावसकर हे कामानिमित्ताने बाहेर गेले होते. १७ जून रोजी दुपारी १.५५ वाजता घरी आले असता घराच्या समोरील दरवाजाचा कडी कोंयडा उचकटल्याचे दिसून आले. घरात जाऊन पाहिले असता हॉलमध्ये व्यवस्थित होते. पण बेडरूममध्ये पाहिल्यास लाकडी कपाटाच्या उजव्या ड्रॉव्हरमध्ये मुलाच्या आजारपणासाठी ठेवलेले ९० हजार रूपये रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केली असल्याचे निदर्शनास आले.

टाईम्स स्पेशल

याबाबत पावसकर यांनी लांजा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असुन पोलीसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३३१(४) ३०५ प्रमाणे भादविकलम ३८०, ४५७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल व्ही.डी.जाधव करीत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg