लांजा - शहरातील राष्ट्रीय महामार्ग 66 येथे लांजा शहरातील पुलाखाली साठवली तिठा ते कुणबी पतसंस्था या दरम्यान पदाचारी, कर्मचारी अधिकारी, सामान्य नागरिक तसेच विद्यार्थी यांना उपयोगी ठरणारा अंडरपास करिता लांजा तालुका संघर्ष समितीने आंदोलनाची भूमिका घेतली होती. या भूमिकेबाबत दिनांक १३/६/२०२६ रोजी राजापूर लांजा साखरपा विधानसभेचे कार्यसम्राट आमदार किरण सामंत यांनी याबाबत समितीच्या पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून दिनांक 19 जून 2026 रोजी हायवेचे पदाधिकारी संबंधित प्रशासकीय अधिकारी त्यांच्या समवेत जनतेची सभा बोलाविली होती. या सभेकरीता लांजातील प्रतिष्ठित नागरिक न्यू एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन जयवंत भाऊ शेट्ये, महम्मद शेठ रंगाची, प्रदीपकुमार बेंडखळे, लांजाचे माजी सरपंच प्रकाश लांजेकर, लांजा शहराच्या माजी नगराध्यक्षा संपदा वाघदरे, उबाटा गटाचे विभाग प्रमुख अल्लाउद्दीन नेवरेकर, समाजवादी नेते बबन मयेकर, संघर्ष समितीचे प्रमुख चंद्रकांत परवडी, नाना मानकर, दिलीप चौगुले, सूर्यकांत लांजेकर, काका शिंदे, शिवाजी शेठ कोत्रे, शिवसेना पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच लांजा राजापूर चे प्रांताधिकारी, लांजाच्या तहसीलदार ढोले, हायवे डिव्हिजनच्या कार्यकारी अभियंता अनामिका कदम, उपविभागीय अभियंता राजेंद्र कुलकर्णी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक रहाटे, जिल्हा परिषद रत्नागिरी समाज कल्याण सभापती ऍड. कांबळे, लांजा पोलीस ठाण्याचे प्रमुख पोलीस इन्स्पेक्टर बगळे असे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
सदरच्या बैठकीत १) पुलाचे डिझाईन करताना अंडरपासची गरज विचार का घेतली नाही ? २) लांजा शहर समन्वय समितीने अंडरपास बाबत ऑगस्ट 2024 पासून मागणी केलेली आहे त्याबाबत काय कार्यवाही झाली आहे ? ३) 31 मे पर्यंत पुलाचे काम पूर्ण होईल अशी ग्वाही मा. केंद्रीय मंत्री महोदय गडकरी साहेबांनी दिली होती त्याचे काय झाले ? ४)शासनाच्या आदेशानुसार वाहतुकीच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे नेमके धोरण काय आहे ? ५) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील लांजा शहरातील अंडरपास बाबत संबंधित खात्याचे केंद्रीय सचिव लेखी पत्र देऊ शकतील काय ? ६)आजचा हायवे,हा आहे तसाच आहे फक्त रुंदीकरण झाले, वळणे काढण्यात आलेली नाहीत याचे नेमके कारण काय ?७) सर्विस रोड आजही व्यवस्थित पूर्ण नाही. ८) पूर्वी हायवेला असणाऱ्या झाडांची तोड करण्यात आली आहे याबाबत पुन्हा झाडे लावणार आहेत का ? तसेच ज्यांच्या भूसंपादनाच्या रकमा आजही देणे आहे त्या देऊन कधी पूर्ण होणार ?असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. याबाबत उपस्थित मान्यवर मंडळींनी आपली रोखठोक भूमिका मांडली.
जनतेच्या प्रश्नांनी प्रशासन अधिकाऱ्यांना निरुत्तर करण्यात आले, हायवेच्या अधिकाऱ्यांवर आमचा विश्वास नाही अशी ठाम भूमिका नागरिकातून मांडण्यात आली. त्याबाबत निश्चित तोडगा काढून आदरणीय आमदार यांनी हे सर्व प्रश्न सोडवण्याची हमी घेऊन आंदोलन करू नये अशी भूमिका स्पष्ट केली. आमदार साहेब आपण पुढाकार घेऊन हे प्रश्न सुटणार असतील तर उपस्थित तमाम जनता रस्त्यावर आंदोलन न करता आपण दिलेल्या तारखेपर्यंत शांत राहतील अशी चर्चा घडून आली. उपस्थित जनसमुदाय, प्रशासन अधिकारी यांनी दिलेली उत्तरे आणि आदरणीय आमदार यांनी काढलेला तोडगा यामधून अपेक्षित असणारे आंदोलन यशस्वी झाले. त्याबद्दल नागरिकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या बैठकीमध्ये संबंधित प्रशासकीय अधिकारी माननीय आमदार आणि सन्माननीय नागरिक यांचे आभार मानण्यात आले. या बैठकीचे सूत्रसंचालन साने गुरुजी विचार मंच लांजा चे सचिव तथा सामाजिक कार्यकर्ते सुधाकर कांबळे यांनी केले होते.






















.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)







































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.