loader
Breaking News
Breaking News
Foto

दादासाहेब सरफरे विद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

बुरंबी–शिवणे : दादासाहेब सरफरे विद्यालयामध्ये २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश विरकर, पर्यवेक्षक महावीर साठे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे सुमारे एक तास विविध योगासने व प्राणायामाचा सराव केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमात विविध प्रकारची योगासने सादर करण्यात आली. विद्यालयाचे क्रीडा प्रमुख सुरेंद्र कुळ्ये आणि ज्येष्ठ शिक्षिका स्मिता हर्डीकर यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व, त्याचे शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम आणि नियमित योगाभ्यासाचे फायदे याविषयी मार्गदर्शन केले.

टाईम्स स्पेशल

योगासन व प्राणायामामुळे शरीर तंदुरुस्त व निरोगी राहण्यास मदत होते, एकाग्रता वाढते तसेच बौद्धिक विकासालाही चालना मिळते, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. या योग दिन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला असून, संपूर्ण विद्यालय परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg