loader
Breaking News
Breaking News
Foto

चाफवलीतील जयश्री चाळके यांचे निधन

देवळे (संगमेश्वर), (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील चाफवली मराठवाडी येथील जयश्री चंद्रकांत चाळके यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ६५ व्या वर्षी दि. १७ जून रोजी सायंकाळी राहत्या घरी निधन झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

श्रीमती जयश्री चाळके चाफवली गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व होते. कै.चंदूशेठ चाळके यांच्या त्या पत्नी. गावातील गोरगरिबांसाठी त्या मायेची पाखर होत्या. येणार्‍या जाणार्‍याला आपुलकीने विचारपूस करून प्रेमाची हाक मारून आदरातिथ्य करणार्‍या होत्या. त्यांच्या प्रेमळ स्वभावाने परिसरातील सर्वांची मने जिंकली होती. त्यांच्या जाण्याने चाफवली परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg