loader
Breaking News
Breaking News
Foto

मंडणगडात शिवसेनेचा हिरकमहोत्सवी वर्षीय वर्धापनदिन साजरा

मंडणगड, (प्रतिनिधी) - जय भवानी ...., जय शिवराय...., शिवसेनेचा विजय असो ..., हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो ...., शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.... , युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे तूम आगे बढो हम तुम्हारे साथ है. ... , अशाप्रकारच्या घोषणांनी सभागृह अक्षरशः दणाणून सोडले याचे पडसाद मंडणगड शहरात चांगलेच दुमदुमले. निमित्त होते ते मंडणगड शिवसेना तालुकाप्रमुख संतोष गोवळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या दणक्यात शिवसेनेच्या हिरक महोत्सवी वर्षीय वर्धापन दिन कार्यक्रमाचे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि शिवसेना मंडणगड तालुका प्रमुख संतोष गोवले यांच्या मार्गदर्शनाखाली मंडणगड शहरातील गोवले कॉम्पलेक्स सभागृहात शिवसेनेचा हिरकमहोत्सवी वर्षीय वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी उप तालुकाप्रमुख संदीप वाघे, युवा सेना मंडणगड तालुका अधिकारी विश्वनाथ टक्के, विभाग प्रमुख अभय पिचुर्ले, उप विभागप्रमुख कलंदर मुंगरुसकर, वसंत अबगुल, रामचंद्र फराटे, सुहेल मुकादम, जितेंद्र सापटे मुल्ला आदींसह शिवसेना युवासेना, महिला आघाडी, युवतीसेना, पदाधिकारी तसेच शिवसैनिक आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg