loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रस्तावित मायनिंग प्रकल्पाविरोधात आजगाव दशक्रोशीतील ग्रामस्थ आक्रमक

सावंतवाडी: आजगाव येथील प्रस्तावित मायनिंग प्रकल्पाविरोधात आजगाव दशक्रोशीतील ग्रामस्थ कमालीचे आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर काल, मंगळवार १६ रोजी श्री देव वेतोबा मंदिरात ग्रामस्थांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला सर्वपक्षीय पदाधिकारी आणि आजगाव दशक्रोशीतील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोणत्याही परिस्थितीत गावात मायनिंग प्रकल्प होऊ देणार नाही आणि यासाठी कायदेशीर व अहिंसेच्या मार्गाने तीव्र लढा उभारण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दोन दिवसांपूर्वी गावात मायनिंय कंपनीच्या पथकाकडून मायनिंगसाठी अनधिकृतपणे ड्रोन सर्व्हे सुरू होता. गावाची कोणतीही पूर्वपरवानगी नसताना हा सर्व्हे सुरू असल्याने संतप्त ग्रामस्थांनी कंपनीच्या पथकाला धारेवर धरले होते. ग्रामस्थांनी या पथकाला थेट श्री वेतोबा मंदिरात आणून जाब विचारला होता. गावाची परवानगी नसताना हा सर्व्हे सुरू केल्याने त्यांना ग्रामस्थांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले होते.

टाईम्स स्पेशल

या सर्व्हे प्रकरणावरून काही ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या या दडपशाहीचा बैठकीत तीव्र निषेध करण्यात आला. गावात मायनिंगसारख्या प्रकल्पांना पूर्ण विरोध असताना हे प्रकल्प स्थानिक जनतेच्या माथी मारण्याचं गौडबंगाल काय आणि यामागील मुख्य सूत्रधार कोण, असे अनेक रोकडे प्रश्न या बैठकीत उपस्थित करण्यात आले. तसेच, ग्रामस्थांवर करण्यात आलेले सर्व आरोप आणि दाखल झालेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, अशी मागणी यावेळी एकमुखाने करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg