देवरूखः मा. न्यायदंडाधिकारी वर्ग १, देवरूख यांनी एक महत्वपुर्ण खटल्याचा निकाल देत चेक बाउन्स प्रकरणातील आरोपी मुआज्जम महमद साटविलकर यांना दोषी ठरविले आहे. न्यायालयाने रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी शाखा- देवरूख यांचे बाजूने निकाल देत आरोपी मुआज्जम महमद साटविलकर यांना चेक बाऊन्स प्रकरणी एकुण दंड रक्कम रु. ३९.५० लाख व साधी कैद असे आदेश दिलेले असून आरोपीने रक्कम न भरल्यास वाढीव कैदेची शिक्षा सुनावली आहे.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी शाखा- देवरूख यांनी आरोपी मुआज्जम महमद साटविलकर यांना वाहन कर्ज वितरित केलेले होते. सदर कर्जाच्या वसुलीपोटी साटविलकर यांनी चेक दिलेला होता. सदर खात्यामध्ये पुरेशी रक्कम शिल्लक नसल्यामुळे चेक बाउन्स झाला होता. तरी या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी शाखा देवरूख यांनी मा. न्यायदंडाधिकारी वर्ग १, देवरूख येथे Negotiable Instrument Act Section १३८ अंतर्गत केस दाखल केली होती. सदर खटल्यामध्ये रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी शाखा देवरूख चे वकिल वाय. जी चंदगडकर यांनी बँकेचे वतीने सादर केलेले दस्तऐवज व युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी मुआज्जम महमद साटविलकर यांना रक्कम रू. ३९.५० लाख दंड व कैद अशी शिक्षा देवून ऎतिहासिक निर्णय दिलेला आहे.
चेकद्वारे दिलेले आश्वासन पाळणे व व्यवहारामध्ये पारदर्शकता राखणे ही कायद्याची मुख्य भुमिका आहे असे न्यायालयाने परखड मत नोंदविले आहे. या निर्णयानंतर न्याय व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झालेला आहे अशी प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त होत आहे. अनेक बँकांमध्ये हजारो चेक बाउन्सच्या केसेस आहेत त्यांनी हा निकाल लक्षात घ्यावा व बँकेची थकित कर्जे परतफेड करावी असा हा निकाल आहे.


















































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)







































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.