मंडणगड (प्रतिनिधी) : शिवसेना जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत मंडणगड येथे पार पडलेल्या मंडणगड आणि दापोली तालुक्यातील शिवसेना पदाधिका-यांच्या सभेत पक्ष संघटनेवर अधिक भर देण्यात यावे, असे एकमताने ठरविण्यात आल्याने शिवसैनिकांमध्ये चैतन्याच्या आनंदाचे वातावरण पसरले आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मंडणगड तालुका प्रमुख संतोष गोवले यांच्या गोवले कॉम्प्लेक्स या शहरातील शिवसेना पक्ष कार्यालयात रविवारी मंडणगड आणि दापोली तालुक्यातील तमाम शिवसैनिक, महिला आघाडी, युवा सेना, शिवसेना अंगीकृत संघटनांचे सर्व आजी माजी पदाधिकार्यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने दापोली विधानसभा मतदारसंघाची सभा मोठ्या उत्साहात पार पडली.
या सभेला एसआयआर करिता खास नेमण्यात आलेल्या दापोली विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना निरीक्षक प्रियांका सावंत, उपजिल्हा संघटक आकांक्षा राणे, मंडणगड दापोली संपर्क संघटक समिक्षा महाडिक यांच्यासह शिवसेना जिल्हा सरचिटणीस अनिल जाधव, शिवसेना महिला आघाडी उप जिल्हा संघटीका मानसी विचारे, शिवसेना मंडणगड तालुका प्रमुख संतोष गोवले, उप तालुका प्रमुख संदिप वाघे, उप तालुका प्रमुख मंगेश दळवी, मंडणगड युवासेना तालुका अधिकारी विश्वनाथ टक्के, शिवसेना दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर, तालूका सरचिटणीस नरेंद्र करमरकर, शिवसेना महिला आघाडी संघटीका सिंधू भाटकर, विभागप्रमुख शैलेश पांगत, प्रदिप गमरे, मंडणगडचे कलंदर मुंगरुसकर, वसंत अबगुल, रामचंद्र फराटे, वामन जाधव, जितेंद्र सापटे, दिपक सुतार, समिर मुल्ला, भेकत, ऊदय जाधव आदींसह शिवसेना पदाधिकारी लोकप्रतिनिधी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मंडणगड आणि दापोली तालुक्यातील शिवसैनिक जागेवरच आहेत.
केवळ निवडणुका पुरताच पक्ष सिमित न ठेवता पक्ष संघटन चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून आवश्यक ते सहकार्य मिळणे गरजेचे आहे. नियुक्त्या करताना तसेच उमेदवार देताना स्थानिक शिवसेना पदाधिकारी शिवसैनिकांना विश्वासात घेऊनच नियुक्त्या तसेच उमेदवारी देण्यात याव्यात अशाप्रकारच्या जोरदार मागणीची या सभेत चर्चा झाली. विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकांना अजून खुप वेळ आहे. हे लक्षात घेऊन येथे लोकसभा तसेच विधानसभा उमेदवार म्हणून निश्चिती करुन त्यांना मतदार संघात कार्यरत राहण्यासाठी पुरेसा वेळ दिला गेला पाहिजे. जे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत झाले त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी भविष्यातील मंडणगड तसेच दापोली नगरपंचायत निवडणूका त्याचप्रमाणे पुढे होणार्या ग्रामपंचायत निवडणूकांसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबविण्यात यावा. दापोली विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते अनंत गितेंकडे सोपविण्यात यावी, याबाबतही चर्चा करण्यात आली त्याला उपस्थितांनी सहमती दर्शवली.














































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)








































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.