loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांची आसुद सोसायटीला सदिच्छा भेट; सोसायटीच्या कामकाजाबाबत व्यक्त केले समाधान

दापोली (प्रतिनिधी) : जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी आसुद ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी सोसायटीच्या एकुणच कामकाजाची माहिती घेत सोसायटीच्या कल्पक आणि यशस्वी कामकाजाचे समाधान व्यक्त केले. यावेळी विशेष लेखापरीक्षक विनोद अंड्रस्कर, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी सुनिल निकम, श्री संतसेना पतसंस्था खेडचे व्यवस्थापक तांबे, दापोली सहाय्यक निबंधक अनिता बटवाल, वेदा मयेकर, संचालक किर्तीकुमार वेलदूरकर, वैभव धामणे, रसिका इंदुलकर अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या वतीने चेअरमन मंगेश बांद्रे आणि व्यवस्थापक चंद्रशेखर देपोलकर यांनी जिल्हा निबंधकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोली तालुक्यातील आसुद येथे कार्यरत असलेल्या आसुद ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड आसुद सोसायटीचे आसुद, आंबवली खुर्द, आणि सालदूरे या महसुली गावांचे कार्यक्षेत्र मर्यादित आहे. अशा या सोसायटीचे व्यवस्थापक चंद्रशेखर देपोलकर यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली संस्था चेअरमन मंगेश बांद्रे यांच्या विश्वासावर आणि संचालक मंडळ यांच्या एकोपा आणि सांघिक प्रयत्न तसेच ठेवीदार, कर्जदार यांच्या उत्तम सहकार्याने संस्थे दरवर्षी सातत्याने अ वर्ग दर्जा टिकवून ठेवला आहे. तालुक्यातील एक सर्वोत्कृष्ट सहकारी संस्था म्हणून या संस्थेने एकापेक्षा एक असे तालुका, जिल्हा, कोकण विभाग आणि राज्यस्तरावरील सहकार क्षेत्रातील मानाचे आणि प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळवले आहेत. अशा या संस्थेच्या भेटीदरम्यान जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी संस्था खरंच पुरस्कारापुरती सिमित आहे की कसे याची पाहणीवेळी पडताळणी केलीच शिवाय जिल्हा उपनिबंधकांनी संस्थेत आलेल्या ग्राहकांशी देखील थेट संवाद साधत संस्था ग्राहकांना खरंच सेवा देते का ? वा ग्राहकांना सेवा देण्यासाठी कुठे कमी पडते याचासुध्दा संस्थेत कामानिमित्त आलेल्या ग्राहकांशी थेट संवाद साधत आढावा जाणुन घेतला. यावेळी त्यांनी जिल्ह्यात पर्यटन व्यवसाय करणारी एकमेव संस्था म्हणून संस्थेचे कौतुक केले. तसेच संगणकीकृत सेवा देणारी संस्था म्हणून देखील संस्थेच्या कामकाजाचा गौरव केला.

टाईम्स स्पेशल

आसुद सहकारी सेवा सोसायटी ही २०२३ पासून प्रतिवर्षी आपल्या सभासदांसाठी लोन मेळाव्याचे आयोजन करत आली आहे. ग्रामीण भागातील लोकासाठी झेरॉक्स, फोटो काढणे सिएसी रोटर मार्फत लाईट बिल, सातबारा, रिचार्ज व अन्य सुविधा संख्येने उपलब्ध दिल्या आहेत. तसेच पर्यटनासाठी आलेल्यांना रहाण्यासाठी उत्तम आणि सर्व सोयीयुक्त रूम उपलब्ध करून पर्यटन व्यवसायातूनही उत्पन्न वाढीचा स्त्रोत निर्माण करण्यास संस्था कमालीची यशस्वी झाली असल्याचे जिल्हा उपनिबंधकांनी प्रत्यक्ष पाहीले. त्यामुळे संस्था केवळ कर्जवाटपापुरती व कर्ज वसुलीपुरतीच मर्यादीत राहिलीलेली नाही तर संस्थेने उद्योग व्यवसाय करत संस्था अधिक भक्कमपणे बळकट केली आहे. याचा आखो देखा हाल येथे आलेल्या जिल्हा उपनिबंधकांना प्रत्यक्ष पाहायला मिळाला. त्यामुळे संस्था कौतुकास पात्र असल्याचे जिल्हा उप निबंधक डॉ सोपान शिंदे यांनी स्पष्ट केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg