रत्नागिरी: समाजाप्रती असलेली बांधिलकी जोपासत 'एकता रत्नागिरी जिल्हा टू-व्हिलर मेकॅनिक असोसिएशन'च्या वतीने "संकल्प शैक्षणिक दातृत्वाचा - २०२६" हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत वायंगणी आणि मावळंगे क्र. २ येथील जिल्हा परिषद शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांच्या शिक्षणाला बळ देण्यात आले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळे दूर करणे, त्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या मनात शिक्षणाविषयी सकारात्मक प्रेरणा निर्माण करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
कार्यक्रमात असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, कंपास बॉक्स आणि इतर आवश्यक शालेय साहित्याचे संच भेट देण्यात आले. यासोबतच, मुलांना खाऊ व लस्सीचे वाटप करण्यात आले. विशेषतः मयुरेश भितळे यांनी विद्यार्थ्यांसाठी लस्सी उपलब्ध करून देऊन या आनंदाच्या क्षणात आपला खारीचा वाटा उचलला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हाच या उपक्रमाचा खरा गौरव असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी एकता असोसिएशनचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते, ज्यात जिल्हाध्यक्ष फैय्याज खतीब, कोकण विभाग अध्यक्ष मिलिंद पवार, सेक्रेटरी धनंजय कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मयुरेश यादव, समीर शेट्ये, दिलीप शिंदे, महेश पालकर यांच्यासह प्रमोद शिवलकर, गणपत वेदरे, जितेंद्र भूते आणि असोसिएशनचे इतर अनेक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. "ज्ञानदान हेच श्रेष्ठ दान" हा विचार प्रत्यक्षात आणत मेकॅनिक असोसिएशनने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले आहे. भविष्यातही शिक्षण आणि समाजसेवेचे असे विविध उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे.








































































.jpg)



























































































































































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.