loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळूणच्या सुपुत्राची आंतरराष्ट्रीय मैदानावर मोहोर; मुजफ्फर शिरळकरची ओमानच्या T20 संघात निवड

संगलट (खेड) (इक्बाल जमादार) - चिपळूण तालुक्यातील शिरळ गावच्या मुजफ्फर नासीर शिरळकर या अवलियाने आपल्या जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मुख्य प्रवाहात मानाचे स्थान मिळवले आहे. ओमानच्या राष्ट्रीय T20 क्रिकेट संघात मुजफ्फरची निवड झाल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरोभागी अभिमानाचा तुरा रोवला गेला आहे. सिंगापूरविरुद्धच्या सामन्यात त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर पाऊल ठेवत आपल्या कारकीर्दीचा नवा प्रवास सुरू केला आहे. मुजफ्फरने आपल्या संघर्षातून हे यश गाठले असून, त्याच्या या कामगिरीने संपूर्ण चिपळूण तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

केवळ स्थानिक क्रिकेटमध्येच नव्हे, तर जागतिक व्यासपीठावर आपल्या कौशल्याची चुणूक दाखवणारा हा खेळाडू आता सप्टेंबर २०२६ मध्ये जपान येथे होणाऱ्या एशियन गेम्समध्येही ओमानच्या संघाकडून दमदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या या यशाचे सर्वस्तरातून स्वागत होत असून, गावकऱ्यांसह स्थानिक क्रिकेटप्रेमींकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg