loader
Breaking News
Breaking News
Foto

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त पं. स. वैभववाडीच्यावतीने ग्रंथालय सुरू

वैभववाडी (प्रतिनिधी) - पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त पंचायत समिती वैभववाडीच्यावतीने आज ग्रंथालय सुरू करण्यात आले. तसेच पंचायत समिती परिसरात वृक्षरोपण कार्यक्रम पार पडला. जिल्हा परिषद सदस्य तथा महाराष्ट्र पणन महामंडळाचे संचालक प्रमोद रावराणे यांच्या शुभहस्ते ग्रंथालय कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती सांची कोलते, जिल्हा परिषद श्रावणी रावराणे, रिद्धी सुतार, सदस्य देवानंद पालांडे, मंगेश लोके, सुवर्ण संसारे, साधना नकाशे, गटविकास अधिकारी श्रीमती माने, तालुका कृषी अधिकारी निरंजन देशमुख, ग्राम विस्तार अधिकारी प्रकाश आडुळकर, संतोष टक्के व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच पंचायत समिती वैभववाडीच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १८ जून रोजी लाभार्थ्यांना मंजूर आदेश वाटप, भजनी कलाकारांना मंजूर आदेश वाटप, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातील सहभागी ग्रामपंचायत यांचा सन्मान, अमृतमहा आवास अभियानमध्ये विभाग स्तरावर प्रथम क्रमांक पटकावणार्‍या तालुक्यातील लोरे नंबर २ या ग्रामपंचायतीचा सन्मान तसेच सर्व उत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून पुरस्कार पटकावणार्‍या करूळ ग्रामपंचायतीचा सन्मान, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानामध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक आलेल्या व तालुक्यात प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणार्‍या शाळांचा सन्मान, बाल स्नेही पंचायत अभिनयामध्ये जिल्ह्यामध्ये तृतीय क्रमांक पटकावणार्‍या कुसूर ग्रामपंचायत व आदिशक्ती टीमचा सन्मान करण्यात येणार आहे. अशी माहिती पंचायत समितीचे सभापती सिद्धेश रावराणे यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg