देवळे( प्रकाश चाळके) - गेल्या दीड शतकापासून साखरपा पंचक्रोशीत आपल्या ज्ञानयज्ञाने हजारो लोकांच्या जीवनातील अज्ञानरूपी अंध:कार नष्ट करणारी साखरपा नं. १ शाळा नेहमीच आपल्या अनोख्या उपक्रमासाठी प्रसिद्ध आहे. नवोदय विद्यालय व शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते शाळेचे झेंडावंदन करणे असो, अथवा फक्त मुलग्यांची शाळा असूनही माता - पालकांसाठी हळदी - कुंकू समारंभाचे आयोजन करणे असो. साखरपा नं.१ शाळा नेहमीच अनोख्या उपक्रमांच्या माध्यमातून समाजदूत म्हणून काम करते.
शाळेच्या पहिल्या दिवशी ' शाळा प्रवेशोत्सवाचे' औचित्य साधून साखरपा नं. १ शाळेत एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले गेले. गेल्या महिन्यात शाळेचा जीर्ण झालेला पूल निर्लेखित केला होता. आमदार किरण सामंत यांच्या सहकार्याने व जिल्हा परिषद उपाध्यक्ष व बांधकाम सभापती विलास चाळके यांच्या प्रयत्नातून त्या जागी नवीन पुलाची उभारणी केली होती. हा पूल बांधून तयार होता. पण त्याचे उद्घाटन झाले नव्हते. या पुलाची उभारणी करण्यात मोलाची मदत करणारे ग्रामपंचायत सदस्य, लक्ष्मण कदम व ठेकेदार मनोज चव्हाण यांच्या संकल्पनेतून या नवीन पुलाचे उद्घाटन इयत्ता पहिलीत प्रवेश केलेल्या साखरपा नं.१ शाळेतील चिमुकल्यांच्या हस्ते करण्याचे ठरले.
कोंडगाव व साखरपा पंचक्रोशीतील मान्यवर व पालकांच्या उपस्थितीत फीत कापून व श्रीफळ वाढवून पहिलीतील लहानग्यांनी या पुलाचे उद्घाटन करून अनोख्या उपक्रमाने आपला शाळेचा पहिला दिवस संस्मरणीय केला. या प्रसंगी कोंडगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच श्रद्धा शेट्ये, सदस्या दीप्ती गांधी, साक्षी चव्हाण, नयना शिंदे, केंद्रप्रमुख दिव्या भाटकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनायक शिंदे, उपाध्यक्षा शुभ्रा नारकर, सदस्या स्नेहा बने, राजेश सावंत, नितिन सकपाळ, पत्रकार संतोष पोटफोडे शाळेचे मुख्याध्यापक सोनवणे, उपशिक्षक बाबासाहेब लाड आदी मान्यवर उपस्थित होते. अनोख्या पद्धतीने शाळेतील नवागतांचे स्वागत करण्याच्या कोंडगाववासियांच्या संकल्पनेचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.





















































































































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)
































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.