तिलारी (प्रतिनिधी) : दोडामार्ग-वीजघर मुख्य महामार्गावरील तेरवण-मेढे येथे गुरुवारी एका आयशर टेम्पोचे चाक रस्त्याच्या साईड पट्टीतील चिखलात रुतल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित रस्त्याच्या साईड पट्टीचे काम अद्याप पूर्ण करण्यात आलेले नाही. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण होणे आवश्यक असतानाही ठेकेदाराने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अपूर्ण साईड पट्टी आणि मुसळधार पावसामुळे रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने वाहनचालकांसाठी धोका निर्माण झाला आहे.
आयशर टेम्पो चिखलात रुतल्याने महामार्गावर काही काळ वाहनांच्या रांगा लागून वाहतूक विस्कळीत झाली होती. दोडामार्ग-वीजघर मुख्य महामार्गाचे काम सुरू असताना अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून, संबंधित ठेकेदाराने तातडीने साईड पट्टीचे काम पूर्ण करून रस्ता सुरक्षित करावा, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.












































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.