मालवण (प्रतिनिधी) - मालवण शहरातील महत्त्वपूर्ण पर्यटन व सांस्कृतिक स्थळांच्या सुशोभिकरणासाठी सुमारे १३ कोटी रुपयांच्या निधीतून हाती घेण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा आज दि. १८ जून रोजी आयोजित करण्यात आला आहे. या विकासकामांचा शुभारंभ कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती मालवण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी दिली आहे.
मालवण नगरपरिषदेने शहरातील पर्यटन आणि नागरिक सोयी-सुविधांना चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करून घेतला असून, या अंतर्गत तीन प्रमुख प्रकल्पांचे भूमिपूजन एकाच दिवशी केले जाणार आहे. यात सकाळी ९.३० वाजता मालवण नगरपरिषद रॉक गार्डन सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन, १० वाजता मालवण नगरपरिषद नमो उद्यान, गवंडीवाडा सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन, १०. ३० वाजता मालवण सांस्कृतिक वैभवाचे केंद्र असलेले मामा वरेरकर नाट्यगृह सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन होणार आहे.
मालवण शहराच्या सौंदर्यात आणि वैभवात भर घालणाऱ्या य महत्त्वाकांक्षी १३ कोटींच्या विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगी शहरातील सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी, नागरिक, व्यापारी आणि हितचिंतकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी केले आहे.







































































.jpg)



























































































































































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.