loader
Breaking News
Breaking News
Foto

स्वा.वि.दा.सावरकर नाट्यगृहामधील समस्यांबाबत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखेचे नगराध्यक्षांना निवेदन

रत्नागिरी - स्वा.वि.दा.सावरकर नाट्यगृहामधील समस्यांबाबत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरी च्या कार्यकारिणीने रत्नागिरीच्या नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे यांची भेट घेऊन निवेदन दिले. सदर निवेदनामध्ये नाट्यगृहातील काही ठिकाणच्या बंद असलेल्या लाईट्स सुरू करणे, पाठीमागील बाजूला काँक्रिटीकरण करणे तसेच नाटकातील कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्यासाठी भोजन कक्ष तयार करणे, नाटकासाठी वापरल्या जाणार्‍या लाईट्ससाठी एक ज्यादा पावरपॅक तसेच एक स्लाइडर नवीन घेणे, स्वच्छतेसाठी नियमित फिनेल पुरवठा करणे, नाट्यगृहामध्ये खाण्याचे पदार्थ नेण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात यावी, नाट्यगृहाच्या आवारामध्ये नाटकाच्या जाहिरातींचे फलक लावण्याकरता एकाच साईज मध्ये चॅनल तयार करणे, आणि म्युझिक सिस्टमसाठी स्टॅबिलायझर बसविणे, तसेच नाट्यगृहासाठी नगरपरिषद प्रशासन, लोकनियुक्त नगराध्यक्ष, नगरसेवक आणि रंगकर्मी यांची एक कमिटी तयार करून सदर कमिटीची दोन महिन्यातून एकदा सभा घ्यावी, जेणेकरून नाट्यगृहातील सर्व समस्या प्रशासनाच्या लक्षात येऊ शकतील.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे तसेच मुख्याधिकारी गारवे यांनी सदर बाबत तातडीने कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले. सदर प्रसंगी नाट्य परिषदेचे अध्यक्ष समीर इंदुलकर, कार्यवाह वामन कदम, कार्यकारणी सदस्य सर्वश्री श्रीकांत पाटील, मनोहर जोशी, घनश्याम मगदूम, दादा कदम, विजय पोकळे उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg