loader
Breaking News
Breaking News
Foto

कोंडखंडकर नंबर १ शाळेमध्ये प्रवेशोत्सव साजरा व मोफत पाठयपुस्तक, गणवेश वाटप

केळंबे-लांजा(सिराज नेवरेकर) - शाळा कोंडखंडकर नंबर.१ तालुका रत्नागिरी या शाळेमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता पहिलीमध्ये व पाचवीमध्ये येणार्‍या विद्यार्थ्यांचे स्वागत वाजत गाजत तिलक लावून आणि फुल देऊन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला व्यवस्थापन समिती अध्यक्ष युवराज आग्रे, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष प्रशांत मांडवकर, व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष मनस्वी भाटकर व सर्व पालक उमेश भाटकर शिक्षण प्रेमी बंधू भाटकर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सर्व मान्यवरांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक अजय कांबळे यांनी पुष्प देऊन केले. यावेळी उपस्थित सर्व पालक, विद्यार्थी यांना सुनील तावडे यांनी मौलीक मार्गदर्शन केले. शाळेच्या पाहिल्यांच दिवशी शाळेचे माजी विद्यार्थी व माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्रशांत मांडवकर व सचिन बनवे यांनी शाळेच्या सर्व मुलांना दहा ते पंधरा हजाराचे शैक्षणिक साहित्य वाटप केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार रमेश पवार यानी मानले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg