loader
Breaking News
Breaking News
Foto

‘दापोली अर्बन बँक कॉलेज’च्या शिरपेचात मानाचा तुरा, प्रा. डॉ. नंदा जगताप यांच्या ‘घरटे संरक्षण उपकरणा’ला राष्ट्रीय पेटंट

दापोली (प्रतिनिधी) - पर्यावरण आणि प्राणिशास्त्र संशोधन क्षेत्रात दापोलीचे नाव राष्ट्रीय स्तरावर झळकले आहे. दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेजमधील प्राणिशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. नंदा भूपाल जगताप यांच्या अभिनव संशोधनाची केंद्र सरकारने दखल घेतली असून, त्यांनी विकसित केलेल्या एका विशेष सुरक्षा उपकरणाला अधिकृत पेटंट बहाल केले आहे. या ऐतिहासिक यशामुळे संपूर्ण कोकणच्या शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रा. डॉ. नंदा जगताप आणि त्यांच्या टीमने ’सर्व्हिलन्स डिव्हाइस फॉर नेस्ट प्रोटेक्शन’ म्हणजेच ‘घरटे संरक्षणासाठी पाळत ठेवणारे उपकरण’ विकसित केले आहे. भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने या उपकरणाची अधिकृत नोंदणी केली असून, याचा समावेश ४९५३०८-००१ - गजणठछअङ.विष या शासकीय दस्तऐवजात करण्यात आला आहे. निसर्गातील दुर्मिळ पक्ष्यांची घरटी, त्यांची अंडी आणि एकूणच वन्यजीवांवर नजर ठेवण्यासाठी तसेच त्यांचे हिंस्त्र प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी हे उपकरण अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. सौर ऊर्जेवर चालणारे हे उपकरण जंगलासारख्या दुर्गम भागातही वीजपुरवठ्याशिवाय अविरतपणे काम करू शकते. प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांचे मार्गदर्शन आणि संस्था चालकांचे पाठबळ या अभूतपूर्व यशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना डॉ. नंदा जगताप यांनी कॉलेजचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांचे विशेष आभार मानले. प्राचार्यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, मोलाचे प्रोत्साहन आणि संशोधनासाठी लागणार्‍या सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळेच हा टप्पा गाठणे शक्य झाले, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg