loader
Breaking News
Breaking News
Foto

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्षपदी ऍड.दीपक पटवर्धन यांची बिनविरोध निवड

रत्नागिरी, - संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील पतसंस्थांची शिखर संस्था असलेल्या राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्षपदी रत्नागिरीचे सुपुत्र व स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था मर्यादित रत्नागिरी जिल्हयाचे अध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन यांची आज बिनविरोध निवड झाली याबद्दल संपूर्ण राज्यातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत. युद्धजन्य परिस्थिती इंधनाचे वाढते दर यामुळे अर्थविश्वासमोर एक आव्हानात्मक परिस्थिती उद्भवली आहे. यामुळे पतसंस्थांसमोर नवीन आव्हाने उभी राहत आहेत अशा परिस्थितीत राज्यभर १९००० पतसंस्थांना योग्य असे मार्गदर्शन व नेतृत्व मिळाले आहे असे उद्गार भारतीय रिझर्व बँकेचे संचालक सतीशजी मराठे यांनी यावेळी काढले व ऍड.दीपक पटवर्धन यांचे अभिनंदन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी पतसंस्था फेडरेशनचे मुख्य प्रवर्तक वसंतराव शिंदे, माजी अध्यक्ष काकासाहेब कोयटे, उपाध्यक्ष डॉ.शिंगी, महासचिव श्री.राजोबा सर, ज्येष्ठ संचालक दादाराव तुपकर यांचेसह पतसंस्था फेडरेशनचे राज्यभरातील सर्व संचालक उपस्थित होते. राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री ना.उदय सामंत, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ.रविंद्र चव्हाण, आमदार किरण सामंत, मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व आमदार प्रवीण दरेकर, सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.उदय जोशी, आमदार प्रसाद लाड यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg