loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग ते आयुष्य हाॅस्पिटल धारगळ दरम्यान कंदबा बस सेवा सुरू करा भाजपाच्या वतीने आम. चंद्रकांत शेटये याना निवेदन

दोडामार्ग (प्रतिनिधी) - गोवा राज्यातील पेडणे धारगळ या ठिकाणी सुरू झालेल्या आयुष्य हाॅस्पिटल मुळे दोडामार्ग तालुक्यातील तसेच चांदेल भागातील रुग्णांना चांगला लाभ मिळत आहे. पण दोडामार्ग येथून धारगळ आयुष्य हाॅस्पिटल थेट बससेवा उपलब्ध नसल्याने नागरिक रुग्ण याना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. वेळेत पोहचता येत नाही. तेव्हा होणारी गैरसोय लक्षात घेऊन दोडामार्ग ते धारगळ आयुष्य हाॅस्पिटल दरम्यान कंदबा बस सेवा सुरू करावी, अशी मागणी दोडामार्ग भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी डिचोली मतदारसंघ आम. चंद्रकांत शेटये यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. दोडामार्ग तालुक्यातील शेकडो रूग्ण आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी धारगळ आयुष्य हाॅस्पिटलमध्ये जातात या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण मोठया प्रमाणात जातात. दोडामार्ग येथून थेट बस सेवा उपलब्ध नाही यामुळे दोडामार्ग तसेच चांदेल भागातील रुग्ण यांची गैरसोय होते. हे आमदार यांच्या निदर्शनास आणून दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg