loader
Breaking News
Breaking News
Foto

वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तन्वी रेडीजची सुवर्ण झेप; भारताला मिळवून दिले सुवर्णपदक

चिपळूण : येथील पाग व्यायामशाळेची योगपटू तसेच नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डी.बी.जे. (स्वायत्त) महाविद्यालयात बी.एस्सी. अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेली कु. तन्वी रेडीज हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी करत वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिपमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे चिपळूणसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हरियाणा येथे झालेल्या निवड चाचणी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून तन्वीची गुजरात येथे आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात निवड झाली होती. या स्पर्धेत ५५ हून अधिक देशांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. आज पार पडलेल्या या स्पर्धेत तन्वीने आपल्या कौशल्याचा उत्कृष्ट आविष्कार सादर करत सुवर्णपदक पटकावले.

टाइम्स स्पेशल

तन्वीने यापूर्वीही योगासन क्रीडा प्रकारात अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सन २०२५ मध्ये झालेल्या एशियन योगासन चॅम्पियनशिपमध्ये तिने दोन सुवर्णपदके जिंकली होती. आतापर्यंतच्या कारकिर्दीत तिने १० सुवर्ण, ३ रौप्य आणि १ कांस्य पदक मिळवून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तन्वीच्या या यशामागे तिचे प्रशिक्षक रणवीर सावंत यांचे मार्गदर्शन आणि परिश्रम महत्त्वाचे ठरले आहेत. तिच्या या जागतिक यशाबद्दल नवकोंकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मंगेश तांबे, पाग व्यायामशाळेचे प्रमुख तथा शिवछत्रपती पुरस्कार विजेते शांताराम जोशी, सुधीर भागवत, सुधारकर काळे, गिरिधर भागवत, विजय चितळे तसेच संस्थेचे पदाधिकारी, सभासद आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. टाइम्स डिजिटल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg