कर्जत (जयेश जाधव) - कर्जत शहर व परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या वारंवार वीज खंडित होण्याच्या समस्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने आज महावितरणच्या कर्जत कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये कर्जत शहरातील नागरिक, व्यापारी, शेतकरी तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. टिळक चौक येथे नागरिक एकत्र जमल्यानंतर मोर्चाला सुरुवात करण्यात आली. घोषणाबाजी करत मोर्चा शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने महावितरण कार्यालयावर धडकला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने महावितरणचे उप कार्यकारी अभियंता केंद्रे यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली.
यावेळी कर्जत शहरातील वाढत्या वीज समस्यांबाबत, वारंवार होणारी वीज कपात, कमी-जास्त व्होल्टेज, सकाळ-संध्याकाळ होणारे वीज खंडित होणे तसेच नागरिकांना होणारा त्रास याबाबत शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर उप कार्यकारी अभियंता केंद्रे यांना लेखी निवेदन सुपूर्द करण्यात आले. निवेदन स्वीकारल्यानंतर केंद्रे यांनी सरकारकडून उपलब्ध होणाऱ्या निधीतून आवश्यक विकासकामे आणि दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन दिले. तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवा अथवा भूलथापांना बळी पडू नये, महावितरण आपल्या जबाबदारीनुसार काम करीत असून वीज पुरवठा अधिक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
सकाळी व संध्याकाळी होणारे वीज खंडित होण्याचे प्रकार कसे कमी करता येतील, त्यासाठी कोणते नियोजन करण्यात येत आहे. तसेच भविष्यातील वीज व्यवस्थापनाबाबत सविस्तर माहितीही त्यांनी शिष्टमंडळाला दिली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या सकारात्मक आश्वासनानंतर निवेदन देऊन मोर्चाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी कर्जत शहराध्यक्ष ॲड. भाऊसाहेब मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्र पवार, कर्जत उपाध्यक्ष राम देशमुख, कर्जत सचिव दिलीप बुंधाटे, मधुकर पाटील, सामाजिक कार्यकर्ते आनंद धेंडे तसेच पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सदर मोर्चा शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडल्याबद्दल शहराध्यक्ष ॲड. भाऊसाहेब मोरे यांनी सर्व कार्यकर्ते, नागरिक आणि पोलिस प्रशासनाचे आभार मानले.












































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.