loader
Breaking News
Breaking News
Foto

पोदार शाळेचा विद्यार्थी चिन्मय सावंत याचा ११ व्या राष्ट्रीय अ‍ॅबॅकस स्पर्धेत सुपर चॅम्पियन किताब देवून सन्मान

रत्नागिरी - रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध पोदार या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी चिन्मय सावंत याला ११ व्या राष्ट्रीय अ‍ॅबॅकस स्पर्धेत सुपर चॅम्पियन हा किताब देवून सन्मानित करण्यात आले आहे. त्यामुळे रत्नागिरी शहरातील नागरिकांकडून त्याचे अभिनंदन केले जात आहे. चिन्मय सावंत हा ग्रेड ४ पर्ल मधील पोदार प्रशालेचा विद्यार्थी असून देशभरातील सुमारे ३ हजार विद्यार्थ्यांमधून केवळ २८ विद्यार्थी या यशापर्यंत पोहोचू शकले. त्यामधील एक चिन्मय असल्याचे त्याचे अभिनंदन केले जात आहे. कठोर मेहनत आणि पोदारची मुल्ये आणि जिद्द यामुळे चिन्मयला मोठ यश मिळाले. रत्नागिरीतील तो एक विद्यार्थी असल्याने रत्नागिरीचे ही नाव देश पातळीवर पोहोचले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg