loader
Breaking News
Breaking News
Foto

जन्म-मृत्यू दाखले आता ग्रामपंचायत स्तरावर; जिल्हा परिषद सदस्य अरुण उर्फ अण्णा कदम यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

खेड (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय अखेर प्रत्यक्षात आला असून, आता जन्म व मृत्यू दाखले ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध होणार आहेत. या निर्णयामागे रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सदस्य अरुण उर्फ अण्णा कदम यांनी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि सभागृहात मांडलेला ठराव महत्त्वाचा ठरला आहे. जन्म-मृत्यू दाखले मिळविण्यासाठी ग्रामस्थांना यापूर्वी पंचायत समिती कार्यालयात जावे लागत होते. यामुळे दूरवरून येणाऱ्या नागरिकांना वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठा खर्च सहन करावा लागत होता. अनेक वेळा दाखले वेळेत न मिळाल्याने नागरिकांची गैरसोय होत होती, तर काहींना वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या समस्येची गंभीर दखल घेत अरुण उर्फ अण्णा कदम यांनी जिल्हा परिषद स्थायी समिती तसेच सर्वसाधारण सभेत (जनरल बॉडी) जन्म-मृत्यू दाखले ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करून देण्याचा ठराव मांडला होता. या ठरावाला सभागृहाने मंजुरी दिल्यानंतर प्रशासनाने आवश्यक कार्यवाही पूर्ण करत संबंधित आदेश जारी केले आहेत. या निर्णयामुळे आता प्रत्येक ग्रामपंचायतीतून नागरिकांना जन्म व मृत्यू दाखले सहज उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील हजारो नागरिकांचा वेळ वाचणार असून प्रशासनिक सेवांचा लाभ अधिक सुलभपणे मिळणार आहे.

टाईम्स स्पेशल

आदेश जारी होताच ग्रामीण भागातील नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत जिल्हा परिषद सदस्यअरुण उर्फ अण्णा कदम यांचे आभार व्यक्त केले आहेत. नागरिकांच्या दैनंदिन अडचणी समजून घेत त्यावर प्रभावी उपाययोजना करण्याच्या अण्णा कदम यांच्या भूमिकेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. "सामान्य नागरिकांच्या सोयीसाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, हा निर्णय ग्रामीण जनतेसाठी मोठा दिलासा ठरणार आहे," अशी भावना अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg