loader
Breaking News
Breaking News
Foto

विर्डी धबधबा वाॅटर पार्क येथे हुबळी धारवाड मधिल पर्यटकाचा बुडून मृत्यू

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यातील शेवटच्या टोकाला गोवा कर्नाटक सीमेवर असलेल्या विर्डी धबधबा वाॅटर पार्क या ठिकाणी मौजमस्ती करण्यासाठी सात जण कर्नाटक हुबळी धारवाड येथून या ठिकाणी आले होते. आंघोळ करण्यासाठी उतरले असता येथील पाण्याच्या खोल डोहात बुडून हुबळी धारवाड येथील विजय दौडमणी वय वर्षे २३ याचा मृत्यू झाला आहे. यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. विर्डी पोलीस पाटील यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यात खबर दिली. यानंतर दोडामार्ग पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे, पोलीस बाबी देसाई, बाळकृष्ण गवस, अभिजीत कांबळे, मानसी गावडे, पोलीस पाटील, सोनिया गवस, विर्डी गावातील ग्रामस्थ युवक घटनास्थळी दाखल झाले. या ठिकाणी नेटवर्क सुविधा उपलब्ध नाही यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या. शिवाय घटनास्थळी वाहन जाणे शक्य नाही, डोंगर चढ उतार नदी पाञ मात्र पाऊस नसल्याने घटनास्थळी जाणे शक्य झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

१४ वर्षापूर्वी याच ठिकाणी गावातील काही युवक आंघोळ करण्यासाठी आले असता एक जण बुडाला होता. घटनेची माहिती मिळताच दोडामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. विर्डी धबधबा वाॅटर पार्क हा गावापासून दोन अडीच किलोमीटर दूर आहे. चालत जावे लागते. येणारे पर्यटक हे चोर्ला घाटातून खाली येतात. या ठिकाणी उंच डोंगरावरून पाणी खाली पडते यामुळे तळे विहीरीच्या आकाराचे खोल डोह तयार झाला आहे. गोवा व कर्नाटक मधिल युवक येथे जास्त येतात. यात आंघोळीसाठी उतरतात याच ठिकाणी आंघोळ करण्यासाठी पर्यटक आले होते.

टाईम्स स्पेशल

विर्डी गावातील ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटक हुबळी धारवाड येथील सात जणांचा ग्रुप या ठिकाणी आला असता ही घटना घडली. या नंतर गावात माहिती दिली. पोलीस पाटील यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यात घडलेल्या घटनेची माहिती दिली. विर्डी धबधबा वॉटर पार्क मध्ये बुडालेल्या युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलीसांसह विर्डी गावातील ग्रामस्थ, युवक प्रयत्न करत होते. विजय दौडमणी यांच्या अपघाती बुडून मृत्यू झाला यामुळे सोबत आलेल्या मिञाना धक्का बसला आहे. विर्डी येथून मृतदेह दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg