loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वर येथे दहावी-बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा उत्साहात

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - संगम ज्येष्ठ नागरिक संघ, परिसर संगमेश्वर यांच्या वतीने दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा संघाचे अध्यक्ष प्रमोद शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली संगमेश्वर येथील विधाता कलेक्शनच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी संगमेश्वर परिसरातील दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थी आपल्या पालकांसह मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे कार्यवाहक उदय संसारे यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यांनी संघाच्या विविध उपक्रमांची माहिती देताना दरवर्षी वृक्षारोपण, धार्मिक स्थळांना भेटी तसेच विद्यार्थ्यांचा गौरव असे विविध उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन संघामार्फत मार्गदर्शन केले जाते. निराधार योजना, श्रावणबाळ योजना, पेन्शन योजना आदींबाबतही त्यांनी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर उपस्थित गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

टाईम्स स्पेशल

यावेळी व्यासपीठावर संगमेश्वरच्या सरपंच प्रज्ञा कोळवणकर, उपसरपंच विवेकभाई शेरे, संघाचे अध्यक्ष प्रमोद शेट्ये, कार्यवाहक उदय संसारे, व्यापारी संघाचे अध्यक्ष बापू भिंगार्डे, दादा कोळवणकर, संघाचे सल्लागार पवार, सचिव कृष्णा बेंडके तसेच संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकृष्ण खातू गुरुजी यांनी आपल्या ओघवत्या वाणीने करून उपस्थितांची मने जिंकली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg