loader
Breaking News
Breaking News
Foto

धामणी ग्रामपंचायतीतील धूळखात पडलेल्या व्हीलचेअर गरजूंना देण्याचा पंचायत समितीच्या बैठकीत ठराव

संगमेश्वर (प्रतिनिधी) - धामणी ग्रामपंचायत इमारतीत गेली दोन वर्षे धूळ खात पडून राहिलेल्या तसेच पुराच्या पाण्यामुळे खराब झालेल्या दिव्यांगांच्या व्हीलचेअरचा मुद्दा अखेर पंचायत समितीच्या मासिक सभेत गाजला. या व्हीलचेअर तात्काळ दुरुस्त करून गरजू दिव्यांगांना वितरित करण्यात याव्यात, असा ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला. सभापती शर्वरी वेल्ये यांनी या प्रकरणी अधिकाऱ्यांकडे माहिती मागवली असता, दिव्यांग मेळाव्यानंतर शिल्लक राहिलेल्या व्हीलचेअर निवडणुकीच्या काळात वापरासाठी आणण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्या धामणी ग्रामपंचायत कार्यालयातच पडून राहिल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावर नाराजी व्यक्त करत सभापती वेल्ये यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या व्हीलचेअर तातडीने सुस्थितीत आणून पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना वितरित करण्याचे निर्देश दिले. तसेच याबाबतचा अधिकृत ठरावही पंचायत समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. यापूर्वी कडवई प्रभाग समितीच्या बैठकीत सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास पेंडसे यांनी हा विषय उपस्थित केला होता. त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार हा विषय पंचायत समितीच्या मासिक सभेत येऊन योग्य निर्णय घेण्यात आला. मात्र, ठराव मंजूर झाला असला तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार आणि गेली दोन वर्षे प्रतीक्षेत असलेल्या गरजू दिव्यांगांना अखेर या व्हीलचेअरचा लाभ कधी मिळणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg