loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबोली - दोडामार्ग संवर्धन राखीव वनक्षेत्रात शिकार करणार्‍या ८ जणांना अटक

सावंतवाडी, (प्रतिनिधी) - आंबोली-दोडामार्ग संवर्धन राखीव वनक्षेत्रात बुधवारी रात्री दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये वन्यजीवांची शिकार करणार्‍या टोळीला वनविभागाच्या पथकाने जेरबंद केले आहे. एका कारवाईत चौकुळ येथील एक जण तर दुसर्‍या कारवाईमध्ये कोल्हापुरातील सात जणांवर अशा एकूण आठ जणांना अटक करण्यात आली आहे. कोल्हापूर परिसरातील आणखी दोन जण फरार होण्यात यशस्वी झाले असून त्यांचा शोध वनविभाग घेत आहे. या कारवाईत आरोपींकडून जिवंत व मृत वन्यजीव, शिकारीचे साहित्य आणि वाहन जप्त करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पहिली कारवाई बुधवारी रात्री रोजी सावंतवाडी दोडामार्ग संवर्धन राखीव वनक्षेत्र मौजे मासुरे येथे करण्यात आली. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे विनापरवाना ठासणीच्या बंदुकीने वन्यजीव साळिंदरची शिकार करून घेऊन जात असताना विठू वाघु कोकरे (वय ४५, रा. चुरणीचीमुस चौकुळ, ता. सावंतवाडी) याला वनविभागाच्या पथकाने सुमारे दीड किलोमीटर पाठलाग करून ताब्यात घेतले. त्याच्याकडून साळिंदर व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्याच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ व भारतीय वन अधिनियम १९२७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

टाईम्स स्पेशल

दुसर्‍या कारवाईत बुधवारी रात्री नंतर पहाटेच्या सुमारास मोठी कारवाई नेने राखीव वनक्षेत्रातील शिरगांवकर पॉईंट येथे करण्यात आली. येथे संशयास्पदरित्या फिरणार्‍या तीन इसमांचा पाठलाग करून चौकशी केली असता, त्यांच्याकडे मृत वन्यप्राणी पिसोरी आणि कटीदर (फटकुर) आढळून आला. त्याच दरम्यान घटनास्थळावरून त्यांच्या इतर चार साथीदारांना चारचाकी वाहनासह ताब्यात घेण्यात आले. मात्र अन्य दोन साथीदार घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी झाले त्यांचा शोध वनविभागाच्या पथकाकडून सुरू आहे. दोन्ही गुन्ह्यातील आरोपींना अटक करून गुरुवारी सावंतवाडी न्यायालयासमोर हजर करण्यात आले त्यानुसार न्यायालयाकडून संबंधितांना अधिक तपासाकरता २० जून पर्यंत तीन दिवसाची वनकोठडी सुनावण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg