loader
Breaking News
Breaking News
Foto

कुरवळ जावळी (तांबडवाडी) गावची कन्या सानिका शिंदे हिची मुंबई पोलीस दलात निवड

खेड तालुक्यातील पंधरा गाव विभागातील कुरवळ जावळी (तांबडवाडी) गावची कन्या सानिका रामदास शिंदे हिची मुंबई पोलीस (म.पो) दलात निवड झाली आहे. गेली ४ वर्षं अथक परिश्रम आणि अभ्यास करून हे यश प्राप्त केले आहे. अपयश आले, दुखापती झाल्या पण न डगमगता आपल्या निर्णयावर ठाम राहून खाकी वर्दी परीधान करण्याचे स्वप्न पूर्ण केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वडिलांनी आपल्या छोट्याश्या व्यवसायातून तिला कष्टाने प्रतिकूल परिस्थितीत वाढवले. सानिकाने आपला दृढनिश्चय माणसाशी बाळगून पोलिस बनून त्यांचे स्वप्न पूर्ण केले. हि निश्चितच आपल्या तरूण मुला मुलींसाठी प्रेरणादायी बाब आहे. निरंतर अभ्यास आणि मेहनत घेतली की कोणतेही सरकारी पद आपण प्राप्त करू शकतो हा विश्वास सर्वांना यामुळे मिळेल.

टाईम्स स्पेशल

तिच्या या यशाचा संपूर्ण कुटुंबाला व गावाला अभिमान असून समस्त कुरवल जावळी गावासाठी ही एक अभिमानास्पद बाब आहे. तिने अशीच उत्तरोत्तर प्रगती करत रहो व यशाची शिखरे गाठून आपल्या कुटुंबियांच व गावच नाव मोठ करावे, यासाठी समस्त कुरवल जावळी गाव ग्रामस्थ यांसकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg