देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील कळकदारा रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून दुपदरी करण्यासाठी खोदलेल्या व सध्या पर्यायी असलेला रस्ता धोक्याचा बनला आहे. निनावे ते ओझरे बु. यामधील काही ठिकाणी रस्त्याला भेगा पडल्या आहेत तर काही ठिकाणी बांधलेल्या मोऱ्याजवळचा रस्ता वाहून गेला आहे. पहिल्याच पावसात रस्त्याची ही दयनीय अवस्था झाली आहे, तर पुढील पावसात काय होणार असा सवाल सामान्य जनतेसह वाहन चालकांनी उपस्थित केला आहे.
सध्या वाहनधारक वाहने चालविण्यास घाबरत आहेत. ठेकेदारांची कामे चालू असताना संबंधित यंत्रणा याकडे लक्ष का देत नाही. जिवितहानी झाल्यावरच संबंधित यंत्रणेला जाग येईल का, अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. रस्त्यामुळे एसटी वाहतूक बंद झाली तर त्याला जबाबदार कोण. शालेय विद्यार्थी, व्यवसायासाठी दररोज येणारे नागरिक, रुग्ण यांची बिकट अवस्था होणार असून संबंधित यंत्रनेने यावर त्वरित उपाय योजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
अजून किती महिने पावसाळा आहे त्या पावसातून हा रस्ता टिकवू शकतो का? पाऊस सुरू होऊन एक दोन दिवस झाले नाही तोपर्यंत हा रस्ता खचला असून वाहून जाण्याच्या परिस्थितीत आहे. जर या एक दोन दिवसाच्या पावसाने या रस्त्याची अशी अवस्था असेल तर या रस्त्याची काय क्वालिटी असू शकते याची संबंधित यंत्रणा चौकशी करेल काय. संबंधित अधिकारी याला जबाबदार म्हणावे की ठेकेदार असा सामान्य जनतेसमोर पडलेला प्रश्न आहे.












































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.