loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या घरपट्टीमध्ये 50% सवलत

पनवेल :- तालुक्यातील ग्रामपंचायतीने स्तुत्य उपक्रम राबवून जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या घरपट्टीमध्ये 50% सवलत देणार असल्याचे जाहीर केले आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी जिल्हा परिषद शाळा चिंध्रण येथे इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे भव्य आणि उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. मिरवणूक काढून, फुलांचा वर्षाव करत आणि शुभ पावलांचे ठसे घेऊन या विद्यार्थ्यांचा ज्ञानमंदिरात प्रवेश सोहळा मोठ्या आनंदात पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रसंगी चिंध्रण गावचे सरपंच एकनाथ पाटील, उपसरपंच मनोज कुंभारकर, सदस्य जीवन पाडेकर, ग्रामविकास अधिकारी ईश्वर पवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ. जागृती पाटील, उपाध्यक्ष राम पाटील, शाळेचे मुख्याध्यापक जाधव तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पालकवर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची घरपट्टीमध्ये 50 टक्के सवलत देण्याचे सरपंच एकनाथ नामदेव पाटील यांनी जाहिर केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg