loader
Breaking News
Breaking News
Foto

लांबणीवर पडलेल्या पावसाचा मालवणच्या किनारपट्टीवर हैदोस, झाडे कोसळली वीज पुरवठा खंडित

मालवण (प्रतिनिधी) -लांबणीवर पडलेला पाऊस अखेर पुन्हा बरसण्यास सुरुवात झाली असून काल रात्रीपासून मालवणात पावसाने हजेरी लावली आहे. तर मंगळवारी देखील दिवसभर पावसाने मुसळधार सुरूच ठेवल्याने गेले अनेक दिवस उकाड्याने हैराण झालेल्या मालवणवासियांना दिलासा मिळाला आहे. तर पावसाच्या आश्वासक हजेरीमुळे शेतकऱ्यांनीही शेतीच्या कामात वेग पकडला आहे. तर सकाळी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बरसलेल्या पावसात तालुक्यात काही ठिकाणी तसेच किनारपट्टीभागात झाडे कोसळून नुकसान झाले. यामुळे मालवण मधील वीज पुरवठादेखील बराच काळ खंडित झाला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जून महिना अखेरीकडे आला असतानाही पाऊस लांबणीवर पडल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र मान्सून पुन्हा सक्रिय होऊन पावसाने हजेरी लावली आहे. मालवणात काल रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली. तर आज सकाळपासून ते रात्रीपर्यंत पावसाने आपला जोर कायम ठेवला होता. सकाळच्या सत्रात जोरदार वाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसात काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. मालवण मेढा भागातील नूर मोहम्मद मुजावर यांच्या बंगल्यावर सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास माडाचे झाड कोसळले. या दुर्घटनेत मुजावर यांच्या बंगल्याच्या स्लॅबची पडझड झाली तसेच तसेच सदर माड उभ्या करून ठेवलेल्या पॅरासेलिंग बोटीवरही पडल्याने बोटीचे नुकसान झाले. या दुर्घटनेत मुजावर यांचे सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान झाले.

टाईम्स स्पेशल

तसेच मुसळधार पाऊस व वाऱ्यामुळे मालवणकडे आचरा, कणकवली व कुडाळ येथून येणाऱ्या तिन्ही वीज लाईन नादुरुस्त झाल्या होत्या. तसेच कुडाळ येथून येणाऱ्या वीज लाईनवर झाड कोसळल्याने वीज दुरुस्तीचे काम वीज वितरण कंपनीकडून चालू होते. यामुळे मालवणात दुपारपासून सायंकाळ उशिरापर्यंत वीज पुरवठा खंडित झाला होता. पावसाळ्यापूर्वी सर्व तयारी केल्याचा दावा करणाऱ्या वीज कंपनीच्या कारभाराची पहिल्या पावसातच पोलखोल झाली. यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg