loader
Breaking News
Breaking News
Foto

बांदा पतंजली योग वर्गात जागतिक योग दिन उत्साहात

बांदा (प्रतिनिधी) - योग ही प्राचीन भारतीय परंपरेने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. आज सर्व जगात असंख्य लोक योगाचा लाभ घेत आहेत .देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाचे महत्त्व जाणून योग दिनाला जागतिक व्यापकता दिली. प्रत्येकाने नियमित योगसाधना करणे गरजेचे आहे. बांदा पतंजली योग वर्गातर्फे योगाचे उत्तम प्रशिक्षण घेण्याची संधी सर्वांसाठी खुली आहे. या योग वर्गाचे कार्य स्तुत्य आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यावा. कारण निरोगी जीवनासाठी योग अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी बांदा येथे केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बांदा पतंजली योग वर्गात जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. बांदा विविध कार्यकारी सोसायटीच्या आळवणी सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. यावेळी विशेष अतिथी म्हणून बांदा सहायक निरीक्षक पंकज शिंदे, बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच रत्नाकर आगलावे, भाजप महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, भाजप मंडल अधिकारी मधुकर देसाई आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रमासाठी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. योगशिक्षक प्रियांका हरमलकर यांनी सर्वांना योग, सूक्ष्म व्यायाम, प्राणायाम, योगासने यांचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले. योगशिक्षक लक्ष्मण पावसकर यांनी आभार प्रदर्शन केले. बांदा येथील सोसायटीच्या या सभागृहात दररोज योग वर्ग सुरू असून त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन बांदा पतंजली योग समितीतर्फे करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg