loader
Breaking News
Breaking News
Foto

मुक्ताई ॲकेडमीच्या दिव्यांका, हर्ष आणि बाळकृष्णची राष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी

सांगली येथील नुतन बुदधिबळ मंडळातर्फे अठराव्या कै.बाबूकाका शिरगावकर फिडे रॅपिड रेटिंग राष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत भारतातील महाराष्ट्रासहित सात राज्यातील 260 खेळाडूंनी सहभाग घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन सावंतवाडी येथील मुक्ताई ॲकेडमीच्या दिव्यांका नार्वेकर, आकाश वाटवे, प्रज्वल नार्वेकर, पुष्कर केळूसकर, चिदानंद रेडकर, हर्ष राऊळ आणि बाळकृष्ण पेडणेकर या विदयार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळ केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुक्ताई ॲकेडमीची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि स्पर्धेतील सर्वात लहान खेळाडू सहा वर्षाची दिव्यांका नार्वेकर हिने दुस-यांदाच राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेऊन दोन पारितोषिके पटकावली. दिव्यांकाने नऊ राऊंड्सपैकी दोन राऊंड्स जिंकून आठ वर्षाखालील मुलींच्या गटात चौथा क्रमांक मिळवला. तीला आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच दिव्यांकाला "बेस्ट परफॉर्मर यंगेस्ट गर्ल"साठी आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. दिव्यांका राष्ट्रीय स्पर्धेत दोन पारितोषिके मिळवणारी पहीली खेळाडू ठरली आहे. आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू हर्ष राऊळ याने पाच राऊंड्स जिंकून चौदा वर्षाखालील मुलांच्या गटात सहावा क्रमांक मिळवला. त्याला आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर याने पाच राऊंड्स जिंकून आणि दोन राऊंड्स बरोबरीत सोडवून रेटिंग कॅटेगरीत सहावा क्रमांक मिळवला. त्याला रोख पारितोषिक आणि आकर्षक मेडल देऊन गौरविण्यात आले.

टाईम्स स्पेशल

विशेष म्हणजे गेली दहा वर्षे सातत्याने मुलांना प्रशिक्षण देऊन राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत खेळण्यासाठी प्रोत्साहित करुन अनेक पारितोषिके मिळवणा-या मुक्ताई ॲकेडमीला "बेस्ट ॲकेडमी" हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष आणि प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मुलांनी यश संपादन केले आहे. सर्व स्तरातुन विदयार्थ्यांचे आणि मुक्ताई ॲकेडमीचे कौतुक करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg