loader
Breaking News
Breaking News
Foto

जि. प. सदस्य नितीन राऊळ यांनी बालस्नेही पंचायतला भेट देऊन विद्यार्थ्यांचा केला गौरव

बांदा (प्रतिनिधी) - ओम गणेश बालसभेमुळे पाडलोसची 'बालस्नेही पंचायत' म्हणून जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने निवड झाली आहे. या बालसभेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नावलौकिक झाले आहे. त्यामुळे या बालस्नेही पंचायतीच्या अभिनंदनाचा ठराव घेणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य, इन्सुली तथा सिंधुदुर्ग शिक्षण समिती सदस्य नितीन राऊळ यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पाडलोसची बालस्नेही पंचायत म्हणून प्रथम क्रमांकाने निवड झाल्याने राऊळ यांनी भेट देत उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी सरपंच सलोनी पेडणेकर, स्वराज सेवा संघाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष प्रवीण पंडित, निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे, उद्योजक सागर राणे, सेवानिवृत्त शिक्षक जगन्नाथ पंडित, पाडलोस सोसायटी व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक, मुख्याध्यापक विजय गावडे, शिक्षक अनिल वरक, ग्रामस्थ दिलीप गावडे, पालक मयुरी कुबल आदी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

नितीन राऊळ यांनी विद्यार्थ्यांचा पुस्तके, वह्या तसेच अन्य शैक्षणिक साहित्य देऊन गौरव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक विजय गावडे यांनी करताना शाळा दुरुस्ती प्रस्तावाकडे सदस्यांचे लक्ष वेधले. प्रास्ताविक शिक्षक अनिल वरक यांनी केले. सरपंच सलोनी पेडणेकर यांनी आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg