loader
Breaking News
Breaking News
Foto

कलारंग थिएटर्स, लांजाच्यावतीने माचाळ येथे स्वच्छतेचा संदेश

केळंबे-लांजा, (सिराज नेवरेकर) - लांजा तालुक्यातील ’कलारंग थिएटर्स, लांजा ’ या नाट्य व सांस्कृतिक संस्थेच्यावतीने लांजा तालुक्यातील मिनी महाबळेश्वर असणार्‍या ’माचाळ’ पर्यटनस्थळी स्वच्छता व साफसफाई करून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. पावसाळा सुरू होत असून माचाळमध्ये मोठ्या प्रमाणात रत्नागिरी जिल्ह्यासह मुंबई, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग या भागातून असंख्य पर्यटक वर्षासहलीचा आनंद घेण्यासाठी येत असतात. येथील सह्याद्रीचे डोंगरकडे, थंड गार वारा, नागमोडी वळणे, नजसरेस पडणारे पशु-पक्षी, पक्षांचे आवाज, गडद वनराई या निसर्ग सौंदर्याची अनुभूती घेण्यासाठी माचाळ पर्यटनाला नागरिकांची गर्दी होत असते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

’लांजा तालुक्यातील कलारंग थिएटर्स,’ लांजा या नाट्य संस्थेच्यावतीने निसर्गसहल व माचाळ परिसर स्वच्छता असा उपक्रम बुधवार दि. १७ जून रोजी राबविण्यात आला. यावेळी स्वछता उपक्रमात सहभागी झालेल्या संस्थेच्या सर्व सदस्यांनी माचाळ मधील महत्वाच्या असणार्‍या ठिकाणी साफसफाई करून परिसर स्वच्छ केला. माचाळ येथे येणार्‍या पर्यटकांना आपला परिसर, स्वच्छ परिसर असा संदेश दिला आहे. स्तुत्य उपक्रम राबविल्याने कलारंग थिएटर्स लांजा या नाट्य संस्थेचे तालुक्यातून कौतुक केले जाते आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg