सावंतवाडी ( प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच पुणे येथील फेडरेशनच्या कार्यालयात पार पडली. यामध्ये फेडरेशनच्या अध्यक्षपदी रत्नागिरी जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष व महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष अँड. दीपक पटवर्धन यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ यांनी दिली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पतसंस्थांची चळवळ अत्यंत मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे. सध्या राज्यात जवळपास १९ हजार पतसंस्था कार्यरत असून, सर्वसामान्य जनतेशी या संस्थांची नाळ खोलवर जोडली गेली आहे. मागील १० ते १५ वर्षांत ही चळवळ अधिक वृद्धिंगत करण्यासाठी तिला संघटित स्वरूप देण्याचे प्रयत्न राज्य स्तरावर झाले आहेत.
प्रामुख्याने कर्ज वसुली संदर्भातील समस्या, आयकर कायद्यातील अडचणी, पतसंस्थांमधील ठेवीदारांच्या ठेवींचे संरक्षण करण्यासाठीच्या उपाययोजना आणि नवतंत्रज्ञानाचे आव्हान पेलणे या विविध पातळ्यांवर राज्य फेडरेशन व जिल्हा फेडरेशन सातत्याने कार्यरत आहेत. ही चळवळ अधिक जोमाने चालवून पतसंस्थांची जनमानसातील प्रतिमा अधिक विश्वासार्ह बनवण्यासाठी सर्वच फेडरेशन प्रयत्नशील आहेत. अँड. दीपक पटवर्धन यांची राज्य फेडरेशनच्या अध्यक्षपदी झालेली ही निवड म्हणजेच कोकण विभागाला मिळालेला एक खूप मोठा बहुमान आहे. अध्यक्षपद कोकणाकडे आल्यामुळे या भागातील अनेक पतसंस्थांनी पटवर्धन यांचे अभिनंदन करत समाधान व्यक्त केले आहे.
या निवडणूक प्रसंगी पुणे येथे स्वतः उपस्थित राहून अँड. दीपक पटवर्धन यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ यांनी सांगितले. पटवर्धन हे कायदेतज्ज्ञ असून, त्यांचा सहकारी पतसंस्था चळवळीचा गाढा अभ्यास आहे. त्यांनी यापूर्वीही महाराष्ट्रात या क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भविष्यात ही चळवळ अधिक भक्कम व गतिमान होईल, असा विश्वास सुनील राऊळ यांनी व्यक्त केला. याप्रसंगी फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ. शांतीलाल शिंगी, तज्ज्ञ संचालक भालेराव यांच्यासह सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.



































































































.jpg)



























































































































































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.