कर्जत (जयेश जाधव) : शारदा मंदिर कर्जत येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध वातावरणात आणि आरोग्य जनजागृतीच्या संदेशासह साजरा करण्यात आला. यंदाच्या योग दिनाची संकल्पना "एक पृथ्वी, एक आरोग्य" अशी असून या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर योगाचे महत्त्व, योग हा केवळ व्यायाम नसून शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधणारी जीवनशैली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार, ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, वज्रासन तसेच विविध प्राणायामांचे प्रभावी प्रात्यक्षिक सादर केले. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक शांतता, एकाग्रता आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते, अशी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
यावेळी तायक्वांदो खेळाडूंनीही योगाभ्यासात सहभाग घेतला. योग आणि क्रीडा हे परस्परपूरक असून खेळाडूंची लवचिकता, संतुलन, सहनशक्ती आणि मानसिक स्थैर्य वाढविण्यासाठी योग अत्यंत उपयुक्त असल्याचे अधोरेखित करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली किसवे यांनी विद्यार्थ्यांना निरोगी व तंदुरुस्त जीवनासाठी नियमित योग करण्याचे आवाहन केले. तसेच ज्येष्ठ शिक्षिका श्रद्धा जामघरे यांनी योग ही भारतीय संस्कृतीची अमूल्य देणगी असून ती आज जगभर स्वीकारली जात असल्याचे सांगितले. प्रफुल देशमुख तसेच शारीरिक शिक्षण शिक्षक सौरभ गौरव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी योगाची विविध प्रात्यक्षिके सादर केली.
शिक्षकवृंद, कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी निरोगी, तणावमुक्त आणि सुदृढ जीवनासाठी नियमित योगाभ्यास करण्याची प्रतिज्ञा घेतली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली असून योगाविषयी सकारात्मक दृष्टीकोन विकसित होण्यास मोठी मदत झाली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शारदा मंदिर शाळेचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.











































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)








































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.